Media

सुभाष घईंचा मराठी सिनेमा 'विजेता' या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर

'सनई चौघडे', 'वळू' आणि 'संहिता' अशा दर्जेदार चित्रपटांनंतर शो मॅन सुभाष घई आणि मुक्ता आर्ट्स घेऊन येत आहेत आगामी चित्रपट 'विजेता'. येत्या 12मार्च रोजी हा रिलीज होणार आहे. या चित्रपटात नामांकित कलावंत काम करत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे, पुजा सावंत, प्रीतम कागणे, सुशांत शेलार, माधव देवचके, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, कृतिका तुळसकर आणि गौरीश शिपूरकर ही कलाकार मंडळी सिनेमामध्ये दिसणार आहे. खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे हे लक्षात येते. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अमोल शेटगे आहेत. राहुल पुरी सिनेमाचे निर्माते आहेत.माधव देवचके बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्याला शोमॅन सुभाष घईंचा चित्रपट मिळाला आहे. सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या 'विजेता' या सिनेमात माधव देवचके मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल शेडगे करणार आहेत. नुकतंच माधवच्या 'विजेता' सिनेमाचा मुहूर्त झाला. सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रिकरणालाही आता सुरूवात झाली आहे. याविषयी माधव देवचके म्हणाला, 'बिग बॉस केल्यानंतर लगेचच सुभाष घईंसारख्या मोठ्या फिल्ममेकरचा सिनेमा मिळाला, हे माझं भाग्यच म्हणायला हवं. सुभाष घईंसारख्या दिग्गज फिल्ममेकरच्या सिनेमात काम करायला मिळणं ही निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजवर त्यांचे अनेक सुपरडुपर हिट सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालोय आणि आता त्यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरच्या चित्रपटात काम करायला मिळणं, हे जणू स्वप्नवतच.'

Read More : MARATHI POPXO